नाव : हर्षल सुभाष जावळे शिक्षण : बी.कॉम., डिप्लोमा (मेकॅनिकल इंजिनीरिंग) गव्हर्नमेन्ट पॉलीटेक्निक, जळगाव
मी २००५ पासून भारतीय जिवन विमा निगम मध्ये विमा प्रतिनिधी म्हणून विमा व्यवसाय करीत आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून माझा हजारो लोकांशी संपर्क आला आणि नंतर गेल्या ४-५ वर्षांपासून मी शेती-प्लॉट खरेदी व्यवसाय सुरु केला. या दोन्ही व्यायसायांमध्ये मला समाजाची आणि समाजातील विविध शेकडो लोकांचे (हितचिंतकाचे) अनमोल सहकार्य लाभले. त्याबद्दल मी त्यांचे शतश: आभार व्यक्त करतो. आज मी जे काही आहे ते फक्त माझे कुटुंब , नातेवाईक, मित्रमंडळी, माझे सर्व हितचिंतक आणि परमेश्वरकृपा यांच्यामुळे मी आज आपणासमोर आणखी एक नवीन उपक्रम सादर करत आहे. वधु-वर सूचीच्या निमित्ताने...
"लेवा वधु-वर सूचक केंद्र आणि मोबाईल सूची" हा उपक्रम करावासा वाटणे या मागेसुद्धा समाजाला होणाऱ्या असुविधांचा आणि आधुनिक बाबींचा विचार व सखोल अभ्यास करून आपल्या सेवेत "लेवा वधु-वर सूचक केंद्र आणि मोबाईल सूची" हा उपक्रम मी सादर करीत आहे. या सारखा उपक्रम करावेसे वाटणे या मागेसुद्धा आपल्या सर्वांचीच प्रेरणा आणि श्रमिक, बौद्धिक, आर्थिक पाठबळ आणि आपले माझ्यावर असलेले भरपूर प्रेम हेच आहे. मी खरंच आपला आणि समाजात असलेल्या प्रत्येक घटकांचा ऋणी आहे आणि राहील. अश्या प्रकारचे सहकार्य व प्रेम भविष्यातही राहील अशी आशा करतो.
हा उपक्रम करीत असतांना माझ्या कडून कळत नकळत काही चुका सुद्धा झाल्या असतील तरी कृपया मला माफ करावे व त्या चुका आमच्या निदर्शनास आणाव्या हि नम्र विनंती म्हणजे आम्हाला त्या सर्व चुका दुरुस्त करून आपल्याला हवी ती योग्य सेवा देता येईल .
हव्या असलेल्या योग्य बदलांची आणि अभिप्रायाची वाट बघतो
आपला ऋणी,
हर्षल जावळे