नियम व अटी
१) वधू – वर नोंदणी ऑनलाइन करता येईल . त्यासाठी www.levashubhmangal.com या आपल्या संकेतस्थळाचा वापर करावा.
२) माहिती पत्रक वधू वराने किंवा जबाबदार पालाकानेच भरावयाचे आहे.
३) माहिती पत्रकात वधू वर संबंधीची संपूर्ण, आवश्यक आणि खरी माहिती भरून द्यावी. आवश्यक माहिती अपूर्ण असल्यास माहिती पत्रक स्वीकारले जाणार नाही . व डिजिटल सूचित वधू वराचे नाव नोंदविले जाणार नाही कृपया याची नोंद घ्यावी.
४) वधू/वरांना ३ फोटो दाखाविण्याची सुविधा असून फोटो स्वतःच्या जबाबदारीवरच टाकावे
५) माहिती पत्रकात अविवाहित घटस्पोटीत/विधवा/ विधुर/अपंग वगैरेचा सविस्तर उल्लेख करणे गरजेचा आहे .
६) विवाहेच्छुक वधू वर परिचय मोबाईल सूची मध्ये माहिती देणे किंवा असलेली माहिती पडताळणे व त्या माहितीच्या आधारे घेतलेल्या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी हि संबंधित वधू , वर आणि त्यांच्या पालकांची किंवा वापरकर्त्याचीच राहील. त्याला लेवा शुभमंगल वधू वर सूचक केंद्र कोणत्याही परीस्थितीत जबाबदार राहणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.
७) विशेषतः विवाहेच्छुक वधू वरांची माहिती भरतांना त्यांचे शिक्षण,व्यवसाय,नोकरी, हुद्दा,नोकरीचे ठिकाण,पत्ता व वार्षिक उत्पन्न भरणे आवश्यक राहील.
८) एका पेक्षा अधिक शिक्षण भरता येतात. शिक्षण भरतांना काही अडचण आल्यास तुमचे शिक्षण “शिक्षणाविषयी इतर माहिती” या विभागामध्ये भरावे तिथे तुमच्या कॉलेज चे नाव,पत्ता आणि विद्द्यापिठाचे नाव सुद्धा भरावे.
९) एका पेक्षा जास्त ठिकाणाहून उत्पन्न असल्यास तसे टाकण्याची सुविधा आहे त्यासाठी प्रथम उत्पन्न भरल्यानंतर “उत्पन्न आणखी जोडा” या बटनावर क्लिक करून आणखी वेगवेगळे उत्पन्न भरता येईल. (व्यावसायिकांनी त्यांचे उत्पन्न सरासरी मासिक टाकावे.)
१०) संपर्कासाठी आपण जास्तीत जास्त ५ ओळखीच्या व्यक्तींचे नावे देऊ शकता. संपर्कासाठी नाव देतांना त्या-त्या व्यक्तीची नाव देण्याची संमती घेऊनच माहिती पूर्ण भरावी. नोकरी आणि व्यवसायाची माहिती सविस्तर भरावी म्हणजे खरोखर जवळची ओळख निघण्यास मदत होईल.
११) वेब साईट वर कोणालाही सविस्तर माहिती पाहायला मिळणार नाही त्यासाठी levashubhmangal हे अँड्रॉइड अॅप्प्लीकेशन गुगल प्ले स्टोअर (GOOGLE PLAY STORE) वरून डाउन लोड करावे योग्य ती माहिती भरावी आणि पेमेंट करावे म्हणजे मग तुमही वधू किंवा वरांची दिलेली संपूर्ण माहिती पाहू शकतात.
१२) कोणत्याही परिस्थितीत अॅप्लीकेशन आणि अॅप्लीकेशन शुल्क रिफंड किंवा ट्रान्स्फर होणार नाही
१३) काही कारणामुळे पेमेंट संबंधी अडचण आल्यास पुढील १० दिवसात कार्यालयीन कामाच्या वेळेस सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल.
१४) मोबाईल सूची मध्ये दिलेली सर्वच माहिती दाखविणे किंवा न दाखविणे या संबधीचे सर्व अधिकार लेवाशुभ मंगल वधू वर सूचक केंद्राकडेच अबाधीत राहतील याची नोंद घ्यावी.
१५) कुणाचीही कोणतेही कारण न कळविता अॅप्लीकेशन सेवा कधीही बंद करण्याचे सर्व अधिकार लेवाशुभ मंगल वधू वर सूचक केंद्राकडेच राखीव असतील.
१६) सर्व सुविधा युक्त अॅप्लीकेशन (पेड वर्जन) फक्त वधू किंवा वर किंवा त्यांचे आई वडील आणि संपर्कासाठी दिलेल्या पत्यांमधील व्यक्ती आणि त्यांनी दिलेले नंबरवरच घेऊ शकतो. यांच्या व्यतिरिक्त कुणीही घेतल्यास ते चालू ठेवणे किंवा कधीही कोणतीही पूर्व सूचना न देता बंद करण्याचे सुद्धा सर्व अधिकार लेवाशुभ मंगल वधू / वर सूचक केंद्राकडेच राखीव राहतील.
१७) वरील सर्व नियम अटी व सूचना मी वाचल्या असून त्या सर्व मला समजलेल्या असून तसेच सूचीचा वापर करताना मी कोणतेही गैर वर्तन करणार नाही आणि फॉर्म मध्ये दिलेली सर्व माहिती हि पूर्ण पणे सत्य असून खरे खोटे पणा विषयी काही वाद निर्माण झाल्यास त्याच्या परिणामांची जवाबदारी हि सर्वस्वी माझीच राहील त्याच प्रमाणे इतरांनी दिलेली माहितीची पडताळणी करणे याची जवाबदारी सुध्दा माझीच असेल त्यास लेवा शुभमंगल वधू /वर सुचेक केंद्र किंवा संकेत स्थळ कोणत्याही परिस्थिती जवाबदार राहणार नाही .
तसेच कोणत्याही न्यायालायासाम्बंधित कामांसाठी भुसावळ हेच न्याय क्षेत्र राहील .
लेवा वधु-वर सूचक केंद्र बस स्टँन्ड जवळ भालोद ता. यावल जिल्हा जळगाव , पिन कोड 425304